Mangal Prabhat Lodha: वकील, बांधकाम व्यावसायिक ते राजकारणी; जाणून घ्या मंगलप्रभात लोढा यांच्याबद्दल...

Rashmi Mane

मंगलप्रभात लोढा

भारतीय जनता पक्षाचा बडा नेता, राज्य मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा आज (18 डिसेंबर) वाढदिवस. वकील, बांधकाम व्यावसायिक ते राजकारणी अशी कारकीर्द असणाऱ्या, लोढा त्यांच्याविषयी जाणून घेऊया.

Mangal Prabhat Lodha | Sarkarnama

वकील म्हणून कार्यरत

मंगलप्रभात लोढा यांनी बी.कॉमचं शिक्षण पूर्ण करून LLBची पदवी प्राप्त केली. त्यानंतर जोधपूरमध्ये ते वकील म्हणून कार्यरत होते. त्यांचे वडील न्यायाधीश होते, वडील न्यायाधीश असलेल्या ठिकाणी वकिली करणं त्यांना योग्य वाटलं नाही म्हणून लोढा मुंबईत आले.

Mangal Prabhat Lodha | Sarkarnama

लोढा ग्रुपची स्थापना

त्यांनी 1980मध्ये लोढा ग्रुपची स्थापना केली. त्यांनी 1982 मध्ये रिअल इस्टेट व्यवसायात जम बसवला.

Mangal Prabhat Lodha | Sarkarnama

भाजपमध्ये काम

लालकृष्ण अडवाणी यांच्या 1990 मध्ये निघालेल्या रथयात्रेने मंगलप्रभात लोढा प्रभावित झाले. त्यानंतर त्यांनी 1993 मध्ये भाजपमधून काम करण्यास सुरुवात केली.

Mangal Prabhat Lodha | Sarkarnama

सलग सहा वेळा आमदार

1995 मध्ये मंगलप्रभात लोढा यांना पहिल्यांदा मुंबईतील मलबारहिलमधून उमेदवारी मिळाली. तेव्हापासून सलग सहा वेळा ते आमदार आहेत.

Mangal Prabhat Lodha | Sarkarnama

देशातील प्रसिद्ध व्यावसायिक

देशातील प्रसिद्ध आणि श्रीमंत व्यावसायिकांमध्ये मंगलप्रभात लोढा यांचं नाव आहे.

Mangal Prabhat Lodha | Sarkarnama

भाजपचे अध्यक्ष

लोढा हे भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आहेत. 

Next : वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी सोडले अधुरे स्वप्नं, आधी IPS नंतर IAS अधिकारी बनलेल्या गरिमा सिंह

येथे क्लिक करा