Rajanand More
काँग्रेसचे नेते व माजी मंत्री मणिशंकर अय्यर राजकारणात सक्रीय नसले तरी त्यांची विधाने काँग्रेसची डोकेदुखी वाढवत आहेत. लोकसभा निवडणुकीतही त्यांनी भाजपच्या हाती आयते कोलित दिले. ही विधाने पाहुयात.
अय्यर यांनी 1963 च्या भारत-पाकिस्तान युद्धाला ‘चीनने केलेला कथित हल्ला’, असे म्हटल्याने वाद निर्माण झाला आहे.
भारताने पाकिस्तानचा सन्मान करायला हवा. त्यांच्याकडे अणु बॉम्ब आहे. सन्मान केला नाही तर ते भारताविरोधात त्याचा वापर करतील.
राजा दशरथाच्या महलात 10 हजार कॅमेरे होते. अशावेळी भगवान रामांचे जन्म तिथे झाला असे कसे म्हणू शकतो.
मुघलांनी कधीही हिंदूंवर अत्याचार केले नाहीत. त्यांनी भारताला आपलेसे केले आणि देशाला सुसज्ज केले.
2014 च्या निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना चायवाला म्हटले होते. हाच मुद्दा भाजपने प्रचारात जोरदार मांडला. तर काँग्रेसला मोठा फटका बसला.
चायवाला नंतर नीच या शब्दानेही 2014 ची निवडणूक गाजली. मोदी हे नीच वृत्तीचे व्यक्ती असून त्यांच्यात सभ्यता नाही, असे अय्यर म्हणाले होते.
मुंबई हल्ल्यातील मुख्य सुत्रधार दहशतवादी हाफिज सईदला ‘हाफिज साहब’ असे संबोधले होते. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता.
पाकिस्तान दौऱ्यावर असताना मोदी सरकार पडल्यानंतरच दोन्ही देशांमध्ये शांतता येईल. एनडीए सरकार पाडण्यासाठी मदत करण्याबाबतचे विधान केले होते.