Ganesh Sonawane
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे अडचणीत सापडलेले हे प्रकरण 29 वर्षांपूर्वीचे आहे.
1995 साली माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांनी आर्थिक दुर्बल घटकातील असल्याचे दाखवून मुख्यमंत्र्यांच्या कोट्यातील 10 टक्के आरक्षित सदनिका मिळवली होती.
ही सदनिका मिळवण्यासाठी त्यांनी कागदपत्रांमध्ये हेराफेरी करुन खोटी कागदपत्रे दिल्याचा आरोप होता.
तत्कालीन दिवंगत राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांच्या तक्रारीवरून जिल्हा प्रशासनाने सदनिका वाटपाची चौकशी केली होती.
याच प्रकरणात तब्बल २९ वर्षांनी दोषी आढळल्याने तत्कालीन कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ विजय कोकाटे यांना प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास आणि 50 हजार रुपये दंडाची शिक्षा प्रथम वर्ग न्यायालयाने सुनावली होती.
त्यानंतर या निकालाविरोधात कोकाटे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अपिल केलं होतं. त्यांना जामीन मिळाला होता.
मात्र कोकाटेंना आता धक्का बसला : प्रथम वर्ग न्यायालयाने दिलेली दोन वर्षे आणि ५० हजार दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयाने देखील कायम ठेवली आहे.
त्यामुळे लोकप्रतिनिधी कायद्यानुसार कोकाटे यांचे मंत्रीपद धोक्यात येऊ शकते. कोकाटे आता उच्च न्यायालयात दादा मागू शकतात.