MGNREGA Scheme : PM मोदी नाव बदलायला निघालेल्या 'मनरेगा'ची काय आहेत वैशिष्ट्ये

Rashmi Mane

‘मनरेगा’ योजना

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार ‘मनरेगा’ योजनेत बदल करण्याच्या तयारीत आहे. नाव बदलण्याच्या चर्चेमुळे ही योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र, मनरेगा ही योजना ग्रामीण भारतासाठी आजही जीवनरेषा ठरतात.

मनरेगा म्हणजे काय?

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGA) हा एक महत्त्वाचा कामगार कायदा आणि सामाजिक सुरक्षा कार्यक्रम आहे. ग्रामीण भागातील कुटुंबांना रोजगाराची हमी देणे, हे या योजनेचं मुख्य उद्दिष्ट आहे.

कधी झाली सुरुवात?

सप्टेंबर 2005 मध्ये मनरेगा कायदा लागू करण्यात आला. या कायद्यानुसार ग्रामीण कुटुंबांना दरवर्षी किमान 100 दिवसांचे हमी रोजगार देण्याची जबाबदारी सरकारवर टाकण्यात आली.

स्त्री-पुरुष समानता

मनरेगा अंतर्गत महिलांना आणि पुरुषांना समान मजुरी दिली जाते. त्यामुळे ग्रामीण महिलांच्या हातात थेट आर्थिक बळ येते आणि कुटुंबाच्या उत्पन्नात त्यांचा सहभाग वाढतो.

मोफत जॉब कार्ड

कामासाठी अर्ज केल्यानंतर 15 दिवसांच्या आत मजुरांना मोफत जॉब कार्ड दिलं जातं. या जॉब कार्डवर संपूर्ण कामाची नोंद केली जाते, त्यामुळे पारदर्शकता टिकून राहते.

संपूर्ण कुटुंबाची नोंदणी

या योजनेत एका कुटुंबातील सर्व प्रौढ सदस्यांची नोंदणी करता येते. त्यामुळे एकाच कुटुंबातील अनेक व्यक्तींना रोजगार मिळण्याची संधी उपलब्ध होते.

मजुरी

घरापासून 5 किमीपेक्षा जास्त अंतरावर काम दिल्यास मजुरांना प्रवास भत्ता दिला जातो. तसेच त्यांच्या मजुरीत 10 टक्के अतिरिक्त वाढ केली जाते.

वेळेवर मजुरी

काम पूर्ण केल्यानंतर 15 दिवसांच्या आत मजुरी थेट बँक किंवा पोस्ट खात्यात जमा केली जाते. यामुळे मजुरांना पैसे मिळण्यात विलंब होत नाही.

Next : मेस्सीला फक्त बघण्यासाठी लोकांनी खुर्च्यो तोडल्या; पण अजितदादांचा नेता सलग 2 दिवस सहकुटुंब भेटला; पाहा PHOTOS

येथे क्लिक करा