Ganesh Sonawane
राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे सिन्नर विधानसभा मतदारसंघातून पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत.
कोकाटे यांनी आपल्या राजकीय प्रवासात अनेक पक्षाचे झेंडे खांद्यावर घेतले आहेत.
कोकाटे यांनी आजवर काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना या चारही प्रमुख पक्षातून निवडणूक लढवली आहे.
भाजप वगळता इतर सर्व पक्षातून ते आमदार म्हणून निवडून आले आहेत.
कोकाटे हे मूळ काँग्रेसी आहेत. 1999 मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
राष्ट्रवादीने विधानसभेची उमेदवारी दिली नाही म्हणून त्यांनी एका रात्रीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर शिवसेनेच्या तिकीटावर १९९९ व २००४ मध्ये दोनवेळा ते शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून आले.
त्यानंतर नारायण राणे यांच्यासमवेत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009 मध्ये ते काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवून आमदार झाले.
त्यानंतर 2014 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपच्या तिकीटावर त्यांनी निवडणूक लढवली परंतु त्यांचा पराभव झाला.
कोकाटे यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप पक्षाचा राजीनामा देऊन अपक्ष उमेदवारी केली होती.
त्यानंतर २०१९ मध्ये कोकाटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि चौथ्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकली.
राष्ट्रवादीचे दोन गट पडल्यानंतर ते अजित पवार यांच्यासोबत आले. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पाचव्यांदा विजयी झाले. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात कृषीमंत्री झाले.