जेलमधून बाहेर येताच भाजपमध्ये प्रवेश अन् आता उपरती!

Rajanand More

मनीष कश्यप

भाजपचे नेते म्हणून काही महिन्यांत ओळख मिळविलेल्या मनीष कश्यप यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

Manish Kashyap | Sarkarnama

सन ऑफ बिहार

मनीषचा जन्म बिहारमधील पश्चिम चंपारणमधील डुमरी महनवा गावात झाला. तो नेहमी स्वत:च्या नावासमोर ‘सन ऑफ बिहार’ असे लिहितो. त्याचे खरे नाव त्रिपुरारी कुमार तिवारी असे आहे.

Manish Kashyap | Sarkarnama

 पुणे कनेक्शन

2016 मध्ये पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून त्याने सिव्हील इंजिनिअररींगची पदवी मिळवली. त्यानंतर त्याने यू-ट्युबवर चॅनेल सुरू करत व्हिडीओ बनविण्यास सुरूवात केली.

Manish Kashyap | Sarkarnama

निवडणूक लढवली

2020 मध्ये मनीषने बिहार विधानसभेची अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. 2024 पासून त्याने पुन्हा निवडणुकीची तयारी सुरू केली.

Manish Kashyap | Sarkarnama

प्रचंड लोकप्रिय

सोशल मीडियात मनीष प्रचंड लोकप्रिय आहे. यू-ट्यूब, फेसबूक, इन्स्टाग्रामवर त्याचे एकूण दीड कोटींहून अधिक फॉलोअर्स आहेत.

Manish Kashyap | Sarkarnama

अटक

तमिळनाडूमध्ये बिहारी लोकांना मारहाणीचा व्हिडीओ मनीषने 2023 मध्ये आपल्या चॅनेलवर टाकला होता. त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला अन् तमिळनाडूसह बिहार पोलिसांनी त्याला अटक केली होती.

Manish Kashyap | Sarkarnama

भाजपमध्ये प्रवेश

तुरूंगातून सुटून आल्यानंतर काही दिवसांतच मनीषने मागील वर्षी भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करताना तो थकत नसायचा.

Manish Kashyap | Sarkarnama

आता टीका

सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी मारहाण केल्यानंतर भाजपकडून उपेक्षा झाल्याने मनीष नाराज होता. त्यानंतर त्याने भाजपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आता तो कोणत्या पक्षात प्रवेश करणार याबाबत उत्सुकता आहे. 

Manish Kashyap | Sarkarnama

NEXT : अखेर मस्क यांच्या ‘स्टारलिंक’ची भारतात एन्ट्री; इंटरनेट मोफत मिळणार की स्पीड वाढणार?

येथे क्लिक करा.