सरकारनामा ब्यूरो
नीता अंबानी अनेक कार्यक्रमादरम्यान वेगवेगळ्या प्रकारच्या डिझायनर केलेल्या साडीतील लूकने सगळ्यांना आकर्षित करत असतात. त्यांना साडी नेसायला आणि भारतीय परपंरा जपायला खूप आवडतं.
त्यांनी याआधीही डिझायनर साडी लूकने लोकांची मने जिंकले आहेत. अशातच त्यांचे काही नवीन साडीवरील लूकचे फोटो चर्चेत आले असून ज्यात त्या खूपच सुंदर दिसत आहे.
मनीष मल्होत्राने वनतारा इनॉग्रेशन उद्घाटन कार्यक्रमातील नीता अंबानीचे दोन साडीतील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
पहिल्या लूकमध्ये, नीता यांनी गुलाबी रंगाची 'नाइन मोटिफ डबल एकात पटोला' साडी नेसली आहे. ही साडी राजकोटमधील राजसरुनगर येथे बनवण्यात आली आहे.
ही साडी खास पारंपारिकपणे नऊ आकृतिबंधात तयार केली जाते. ज्यांना अडाताला डिझाइन म्हणतात. ही साडी सात लोकांनी तयार केली असून यासाठी तब्बल सात महिन्यांचा कालावधी लागला आहे.
नीता यांनी या साडीवर मनीष मल्होत्राच्या म्हणण्यानुसार, गणेश हार आणि शिपल्यातून काढलेल्या दुर्मिळ मोत्यांनी बनवलेल्या अंगठीही घातली होती.
हातांनी विणलेली मुर्शिदाबाद सिल्क साडी' नेसली आहे. जी ऑफ व्हाइट, गुलाबी आणि नारंगी रंगाच्या पॅटर्नची साडी मुख्यता पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात बनवली जाते. यावर मनीष मल्होत्रा यांनी एंब्रॉयडरी केलेली आहे.
नीता यांनी या साडीवर हिरवा कुंदनचा हार,पांढऱ्या रंगाचे कानातले आणि हातात बांगड्या घालत त्यांचा लूक पूर्ण केला. सिंपल मेकअप, कपाळावर टिकली आणि केसात गजरा लावून त्या 60 व्या वर्षीही त्यांची सून राधिका आणि श्लोका यांनाही लाजवेल असा लूक सध्या चर्चेत आहे.