Aslam Shanedivan
छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेल्या औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात वाद सुरू झाला आहे.
कबर काढून टाकावी यासाठी नागपुरात सोमवारी (ता.17) आंदोलन झाले. ज्यानंतर दंगल उसळी असून यात दगडफेकीसह जाळपोळ करण्यात आली आहे.
यावेळी अनेक नागरीकांसह पोलिसदेखील जखमी झाले असून एका डीसीपींवर कुऱ्हाडीने वार हल्ला झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
कुऱ्हाडीने वार करण्यात आलेले डीसीपी IPS निकेतन कदम आहेत.
निकेतन कदम हे 2018 बॅचचे IPS अधिकारी असून त्यांना महाराष्ट्र केडर मिळाले आहे. त्यांची पहिली पोस्टिंग लातूर जिल्ह्यातील चाकोरमध्ये SDPO होती
निकेतन कदम यांचा जन्म नाशिकमध्ये झाला असून त्यांचे शिक्षण मराठी माध्यमातून झाले आहे. त्यांनी डिप्लोमा आणि बिटेक केलं आहे
बिटेक केल्यानंतर त्यांना चांगल्या पगाराची नोकरी मिळाली होती. पण त्यांचे स्वप्न हे IPS होण्याचे होतं
दिल्लीत जाऊन त्यांनी UPSCची तयारी केली. पहिल्या प्रयत्नात त्यांना यश आले नाही. पण तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी UPSC क्रॅक केली
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.