Rashmi Mane
माजी पंतप्रधान, कुशल अर्थतज्ज्ञ आणि राजकारणातलं अजातशत्रू राजकीय व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे डॉ. मनमोहन सिंह यांचं 92 व्या वर्षी निधन झालं आहे.
त्यांनी 2004-2014 दोन टर्म भारताचे पंतप्रधान म्हणून काम केले आणि देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली.
फाळणीनंतर डॉ. मनमोहन सिंग यांचे कुटुंब पंजाबमधील अमृतसर येथे गेले. मनमोहन सिंग यांनी 1958 मध्ये गुरशरण कौर यांच्याशी विवाह केला.
त्यांना अमृत सिंग, दमन सिंग आणि उपिंदर सिंग अशा तीन मुली आहेत. मनमोहन सिंग यांची मोठी कन्या उपविंदर सिंग या सुप्रसिद्ध इतिहासकार आहेत.
उपिंदर सिंग या सेंट स्टीफन्स कॉलेज, दिल्लीचे माजी विद्यार्थी आहेत आणि त्यांनी मॅकगिल विद्यापीठ, कॅनडातून पीएचडी केली आहे. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून इतिहासात मास्टर ऑफ आर्ट्स आणि एम.फिल. पदवी आहे.
मनमोहन सिंग यांची दुसरी मुलगी दमन सिंग त्या लेखिका आहेत. दमन सिंग यांनी सेंट स्टीफन्स कॉलेज, दिल्ली आणि इंस्टिट्यूट ऑफ रूरल मॅनेजमेंट, आनंद, गुजरातमधून पदवी मिळवली आहे. दमन यांचे लग्न IPS अधिकारी अशोक पटनायक यांच्याशी झाले.
मनमोहन सिंग यांची तिसरी मुलगी अमृत सिंग अमेरिकन सिव्हिल लिबर्टीज युनियन (ACLU) मध्ये वकील आहेत.