Manmohan Singh : पाकिस्तानात जन्म, रिझर्व्ह बँकचे गव्हर्नर अन् सलग दोनवेळा पंतप्रधान; मनमोहन सिंग यांची डोळे दिपवणारी कारकीर्द

Jagdish Patil

डॉ. मनमोहन सिंग

भारताचे माजी पंतप्रधान, अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांनी दिल्लीतील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला, ते 92 वर्षांचे होते.

Manmohan Singh | Sarkarnama

दुखवटा

सिंग यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. सिंग यांची कारकीर्द केशी होती ते जाणून घेऊया.

Manmohan Singh | Sarkarnama

जन्म

मनमोहन सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी झाला. फाळणीच्या काळात त्यांचं कुटुंब भारतातील अमृतसरला आलं होतं.

Manmohan Singh | Sarkarnama

पदवी

त्यांनी हिंदू महाविद्यालयात शिक्षण पूर्ण केलं. तर पंजाब विद्यापीठातून 1952 पदवी आणि 1954 मध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली.

Manmohan Singh | Sarkarnama

केंब्रिज विद्यापीठ

1957 मध्ये केंब्रिज विद्यापीठातून अर्थशास्त्रात ऑनर्स पदवी मिळवली. 1966 ते 1969 या काळात संयुक्त राष्ट्रांच्या व्यापार आणि विकास परिषदेसाठी काम केलं.

Manmohan Singh.jpg | Sarkarnama

प्राध्यापक

1969 मध्ये मनमोहन सिंग दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराचे प्राध्यापक झाले.

Manmohan Singh | Sarkarnama

गव्हर्नर

1982 मध्ये त्यांची देशातील सर्वात महत्वाच्या अशा रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी नियुक्ती करण्यात आली. 1991 साली ते केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष बनले

Manmohan Singh.jpg | Sarkarnama

पंतप्रधान

तर 2004 ते 2014 या काळात ते भारताचे पंतप्रधान होते. मनमोहन सिंग जवाहरलाल नेहरू यांच्या नंतरचे पहिले पंतप्रधान होते ज्यांनी 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आणि पुन्हा विजयी झाले.

Manmohan Singh.jpg | Sarkarnama

NEXT : आतापर्यंत किती पंतप्रधानांना मिळाला 'भारतरत्न' सन्मान? एकाच कुटुंबात 3, तर एक शेतकऱ्यांचे कैवारी...

Bharat Ratna | Sarkarnama
क्लिक करा