सरकारनामा ब्युरो
भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये युद्धाची ठिणगी पडली आहे. दोन्ही देशांच्या सीमेवर तणावाचे वातावरण आहे.
पण या सगळ्यात भारताला पहिल्यांदा पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करणाऱ्या संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांची आठवण येत आहे.
'आरएसएस'चे स्वयंसेवक, गोव्याचे मुख्यमंत्री ते देशाचे संरक्षणमंत्री, असा मनोहर पर्रिकर यांचा प्रवास होता.
मुख्यमंत्री ते संरक्षणमंत्रिपदापर्यंत पोहोचूनही त्यांनी साधेपणा अखेरच्या श्वासापर्यंत जपला.