Dinvishesh 13 December : गोव्याचे 10 वे मुख्यमंत्र्यांचा जन्म आणि बरचं काही; वाचा आजचे दिनविशेष

Rashmi Mane

1955 - गोव्याचे 10 वे मुख्यमंत्री, देशाचे माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांचा जन्म

Manohar Parrikar | Sarkarnama

1994 - सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व, वारणा परिसराच्या विकासाचे शिल्पकार व आशिया खंडातील आदर्श मानल्या जाणाऱ्या वारणा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक विश्वनाथ अण्णा ऊर्फ तात्यासाहेब कोरे यांचे निधन.

Tatyasaheb Kore | Sarkarnama

1996 - देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील कॅपिटॉल बॉंबस्फोट प्रकरणाचे सूत्रधार व ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व क्रांतिकारक श्रीधर पुरुषोत्तम ऊर्फ शिरुभाऊ लिमये यांचे निधन.

Shirubhau Limaye | Sarkarnama

2001 - आत्मघातकी दहशतवाद्यांनी भरदिवसा संसद भवनाच्या आवारात घुसखोरी करून बॉबस्फोट आणि अंदाधुंद गोळीबार केला. या घटनेत नऊ सुरक्षा अधिकारी दहशतवाद्यांच्या हल्ल्याचा प्रतिकार करताना धारातीर्थी पडले व पाच दहशतवादी ठार झाले.

Sakal News Paper | Sarkarnama

2002 - ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक यश चोप्रा यांना 2001चा "दादासाहेब फाळके पुरस्कार' जाहीर. भारतीय चित्रपट जगतातील हा सर्वोच्च सन्मान आहे.

Yash Chopra | Sarkarnama

2003 - प्रसिद्ध बंगाली लेखिका महाश्‍वेतादेवी यांना "ऑफिसर ऑफ आर्टस ऍन्ड लिटरेचर' हा फ्रान्सचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी किताब जाहीर. साहित्य व कला क्षेत्रातील कामगिरीबद्दल हा किताब देण्यात येतो.

Mahasweta Devi | Sarkarnama

2003 - वेगळ्या विदर्भ राज्याच्या प्रकाश आंबेडकर, शरद जोशी, दत्ता मेघे आणि बनवारीलाल पुरोहित या चार विदर्भवाद्यांनी एकत्र येतद विदर्भवादी आघाडीची स्थापना केली.

News Paper | Sarkarnama

Next : अर्पिता ठुबेंना सॅल्युट! 3 वर्षांत दोनदा UPSC क्रॅक, आधी IPS अन् आता IAS...

येथे क्लिक करा