Pradeep Pendhare
विधानसभा निवडणूक 2024नंतर विधिमंडळात ओबीसी आमदारांची संख्या 78 एवढी झाली आहे.
विधानसभा 2019च्या निवडणुकीत 40 ओबीसी आमदार निवडून आले होते.
विधानसभा निवडणूक 2024 मध्ये 104 मराठा आमदार आहेत. गेल्या विधानसभा 2019 मध्ये 118 मराठा आमदार होते.
महायुतीमधील भाजप 43, एकनाथ शिंदे यांच्या 13, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतून नऊ ओबीसी आमदार निवडून आलेत.
मविआमधील काँग्रेस चार, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून तीन आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून तीन, असे ओबीसी आमदार निवडून आले.
इतर पक्षातून तीन ओबीसी आमदार निवडून आले आहेत.
मनोज जरांगे यांचे वर्षभरापासून मराठा आरक्षणाच्या आंदोलनानंतर देखील विधानसभेत ओबीसी आमदारांचा टक्का वाढला.
राज्यात 1962 पासूनच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल पाहिले, तर ओबीसी आमदारांची संख्या 51 पेक्षा अधिक कधी नव्हती.