Roshan More
29 ऑगस्ट 2023 ला आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे सुरू असलेल्या आंदोलनात पोलिसांनी लाठीचार्ज केला. या लाठीचार्जमध्ये महिला जखमी झाल्याने संताप व्यक्त केला गेला.
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावे, आरक्षण मिळावे यामागणी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे तब्बल 17 दिवस उपोषण केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः अंतरवाली सराटीमध्ये येत आश्वासन दिल्याने मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले.
मराठ्यांच्या कुणबी नोंदींच्या शोध घेण्यासाठी माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समितीची नियुक्ती करण्यात आली.
आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जानेवारी 2024 मध्ये 'चलो मुंबई'ची हाक दिली. मोठ्या संख्येने मराठा बांधवांनी मुंबईकडे कूच केली. मुंबईकडे जाताना लोणावळ्यापासून जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले.
मनोज जरांगे पाटील नवी मुंबईतील वाशी येथे असताना मुख्यमंत्री शिंदे यांनी सगेसोयरेची अधिसूचना काढली. तसेच मराठा आंदोलकांचे गु्न्हे मागे घेणार असल्याची घोषणा केली. शिवाय न्या.शिंदे समितीला मुदतवाढ दिली.
मुख्यमंत्री शिंदेंच्या अधिसूचनेमुळे मनोज जरांगे पाटील यांनी शिंदेंच्या हस्ते उपोषण सोडले. तसेच मराठा बांधवांना गुलाल उधळला.
सगेसोयऱ्यामध्ये त्रुटी दूर करण्यासाठी मनोज जरांगेंनी लोकसभा निवडणुकीनंतर 8 जूनला उपोषण सुरू केले. सहा दिवसांपासून सुरु असलेले जरांगेंचे उपोषण स्थगित करण्यात आले. मागण्या मान्य करण्यासाठी सरकारला एका महिन्याचा वेळ देण्यात आला.
सरकारला मुदत देऊनही मार्ग न निघाल्याने 20 जुलैपासून जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले. त्यांची प्रकृती ढासळल्याने सलाईन लावून उपोषण करणार नाही, अशी भूमिका घेत 24 जुलैला महिलांच्या हस्ते ज्यूस घेत जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केले.
29 ऑगस्ट 2023 ला क्रांती झाली शहागडच्या पैठण फाट्यावर उठाव झाला. मराठा एक होत नाही हे चॅलेंज होतं. मराठा एक झाला, मराठा समाज एकजूट आहे हाच आयुष्याचा आनंद आहे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
वर्षभर आंदोलन करूनही मनोज जरांगे पाटील यांची ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण देण्याची मागणी मान्य झाली नाही.