Akshay Sabale
मनोज जरांगे-पाटील यांनी अजय महाराज बारसकर यांच्याबाबत खळबळजनक दावे केले आहेत.
"बारसकर हा महाराज शब्दासाठी डाग आहे," अशी टीका जरांगे-पाटलांनी केली आहे.
एकेरी उल्लेख करत जरांगे-पाटील म्हणाले, "तो काय महाराज आहे काय? तो विकत घेतलेला आहे. मी काय वाईट केलं?"
"10 टक्के आरक्षण मिळालं. मराठा समाज एकत्र आणला. मग, मी चूक केली का? नाव ठेवण्यासारखं मी काय केलं?" असा सवाल जरांगे-पाटलांनी उपस्थित केला.
"बारसकरने महिलेवर बलात्कार केल्याचं त्याच्या गावातील लोक सांगत आहे."
"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रवक्त्याचा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळील एका मोठ्या नेत्याचा बारसकर हा एक ट्रॅप आहे."
"ज्या महिलेवर विनयभंग झाला, ते प्रकरण दाबण्यात आलं. माझ्याविरोधात बोल अन्यथा विनयभंगाचे प्रकरण उघड करू, असा दबाव बारसकरवर टाकण्यात आला."
"बारसकरने कुठल्या तरी संस्थेच्या नावाखाली 300 कोटी रूपये जमा केले आहेत."
"पहिल्या गावातून भिशी घेऊन दुसऱ्या गावात बारसकर पळून गेला. बारसकर हा महाराज शब्दासाठी डाग आहे," असा हल्लाबोल जरांगे-पाटलांनी केला आहे.