Rashmi Mane
मराठा आरक्षणासाठी झगडणारे मनोज जरांगे पाटील मुंबईतल्या आंदोलनामुुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. तसेच त्यांचा 15 वर्षांपूर्वीचा त्यांचा एक खास फोटो व्हायरल झाला आहे.
गेल्या 15 वर्षांत त्यांनी 30 हून अधिक मोठी आंदोलनं केली आहेत. यामुळे ते मराठा समाजाचे नेतृत्व करणारे चेहरे बनले आहेत.
आज मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन चालू आहे. मुंबईत मराठा आंदोलकांचा रस्त्यांवर ठिय्या. या आंदोलनाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, त्यांच्या जुन्या आठवणीही समोर येत आहेत. एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी बारावीचे शिक्षण सोडले. तेव्हापासून त्यांनी आपले आयुष्य मराठा आरक्षणासाठी झोकून दिले
आणखी एक फोटो लग्न सोहळ्यातील आहे.
या फोटोत मनोज जरांगे मित्रांसोबत क्रिकेट खेळताना दिसतात आहेत.
हा फोटो जवळपास 15 वर्षांपूर्वीचा असल्याचे समजते.