Roshan More
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. सीएसटी स्थानक आणि स्थानकाबाहेर देखील आंदोलकांनी गर्दी केली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अनेक खासदार आमदारांनी पाठींबा दिला होता.
आमदार खासदारांनी फक्त पाठींबाच दिला नाही तर आझाद मैदानावरील आंदोलनात सहभागी देखील त्यांची नावे पाहू.
धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी हे आंदोलनात सहभागी झाले. तसेच जरांगे पाटील यांची भेट घेतली.
आमदार संदीप क्षीरसागर, आमदार प्रकाश सोळुंखे यांनी आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत आंदोलनाला पाठींबा दिला.
बीडचे खासदार बजरंग सोनवणे, परभणीचे खासदार संजय जाधव यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत आंदोलनात सहभाग घेतला.
मराठ्यावाड्यातील खासदार-आमदार मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले असताना अहिल्यानगर जिल्ह्यातून खासदार खासदार निलेश लंके आंदोलनात सहभागी झाले आहेत.