Pradeep Pendhare
मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनात केंद्रस्थानी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मुद्दा आहे. हैदराबाद गॅझेटियर, जुन्या नोंदी आणि कुणबी-मराठा संबंधी कागदपत्रांचा वापर करण्याची मागणी आहे.
सरकारसमोरचा सर्वात संवेदनशील सामाजिक पेच म्हणजे, मराठा समाजाला कुणबी म्हणून प्रमाणपत्र मिळाल्यास त्याचा ओबीसी आरक्षणावर परिणाम होणार आहे.
सरकारच्या म्हणण्यानुसार जरांगेंच्या अनेक मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही झाली आहे; 15 पैकी 12 मागण्या पूर्ण झाल्याचा दावा आहे. पण जरांगेंची अपेक्षा आहे की, निर्णय कागदावर नव्हे, प्रत्यक्ष अंमलात यावा.
मुंबईत मोठ्या संख्येने आंदोलक आले तर वाहतूक, गर्दी आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे. गतवर्षीच्या आंदोलनावेळी मुंबईकरांनी सरकारच्या नियोजनावर नाराजी व्यक्त केली होती.
मुंबई उच्च न्यायालयाने जरांगे पाटलांना मुंबईत येऊन शांततामय आंदोलन करण्यापासून रोखण्यास नकार दिला आहे. त्याचवेळी सरकारने कायदा-सुव्यवस्था आणि आवश्यक वैद्यकीय मदतीची काळजी घ्यावी, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत मोठी गर्दी असते. त्यामुळे त्याच काळात मोठे आंदोलन झाल्यास प्रशासनासमोर अतिरिक्त कायदा-सुव्यवस्था आणि वाहतुकीचे आव्हान उभे राहू शकते.
आझाद मैदानात मराठा आणि ओबीसी, अशा दोन्ही बाजूंच्या आंदोलनांचा संदर्भ आधीच समोर आला आहे. एकाच ठिकाणी दोन्ही आंदोलनांचा संघर्ष होऊ नये, यासाठी प्रशासनाला अत्यंत काळजी घ्यावी लागणार आहे.
जरांगे पाटील मागण्यांची तातडीने अंमलबजावणी करण्यावर ठाम आहेत; दुसरीकडे सरकार कायदेशीर प्रक्रिया, उपलब्ध नोंदी आणि आरक्षणाच्या न्यायालयीन टिकाऊपणाचा विचार करत आहे. या निर्णयाबरोबरच ओबीसी समाजाचा विरोध कसा टाळायचा आहे.