Pradeep Pendhare
PM-VBRY योजना 1 ऑगस्ट 2025 पासून लागू करण्यात आली असून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) द्वारे राबवली जाते.
पहिल्यांदाच औपचारिक क्षेत्रात नोकरीत प्रवेश करणाऱ्या युवकांना एक महिन्याच्या वेतनाएवढी रक्कम 15 हजार रुपये दोन हप्त्यांमध्ये दिली जाते.
किमान सहा महिने टिकून राहिलेल्या प्रत्येक अतिरिक्त कर्मचाऱ्यासाठी, सरकार नियोक्त्यांना दोन वर्षांपर्यंत दरमहा 3000 रुपयांपर्यंत प्रोत्साहन मिळतो.
या लाभासाठी कर्मचारी आर्थिक साक्षरता पूर्ण करणे आवश्यक असते, अशी महत्त्वाची अट योजनेत आहे.
नवीन रोजगार निर्माण करणाऱ्या आणि टिकवून ठेवणाऱ्या कंपन्यांना किंवा मालकांना आर्थिक प्रोत्साहन दिले जाते.
या योजनेचे लाभ 1 ऑगस्ट 2025 ते 31 जुलै 2027 या कालावधीत निर्माण झालेल्या रोजगारांना लागू होणार आहेत.
PMVBRYसाठी 99,446 कोटींची तरतुदीसह 3.5 कोटींहून अधिक रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देणारी योजना
कंपनी ईपीएफओकडे नोंदणीकृत असण्याबरोबरच सहा महिन्यांच्या कालावधीसाठी, कमीतकमी दोन किंवा पाच अतिरिक्त कर्मचारी कायमस्वरूपी असावेत.
या योजनेचा उद्देश, विशेषतः संघटित क्षेत्रात, रोजगाराच्या अधिक संधी निर्माण करून बेरोजगारी कमी करणे हा आहे.