Rashmi Mane
नारायणगडावर मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा पार पडला. त्यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणावरून आपली भूमिका स्पष्ट केली.
महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी शेकऱ्यांसाठी नवा लढा सुरु केला आहे. दसरा मेळाव्यात त्यांनी सरकारकडे 8 मोठ्या मागण्या केल्या आहेत.
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सरकारने दिवाळीच्या आधी ओला दुष्काळ जाहीर करा, अशी पहिली मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी सरसकट 70 हजार रुपये भरपाई, शेतजमीन, पीक वाहून गेलं असेल तर त्यांना 1 लाख 30 हजार भरपाई, जनावरं वाहून केली, पीकं वाहून गेली, त्यांना शेतकरी सांगेल तसा पंचनामा करून 100 टक्के भरपाई.
3.ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा एक रुपयाही कापायचा नाही. सरकारी कर्मचारी-अधिकाऱ्यांचे पगार कापा. राजकीय नेते, उद्योगपतींकडून पैसे घ्या.
4. शेतकऱ्यांची सध्याची परिस्थीती पाहता सरकारने संपूर्ण कर्जमुक्ती करावी.
5. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना सरकारी नोकरी देण्यात यावी.
6. सरकारने शेतकऱ्यांच्या शेतीमालाला चांगला हमीभाव द्यावा.
7. शेतीला नोकरीचा दर्जा द्यावा. (उदा. दहा एकराच्या आत शेती असलेल्या शेतकऱ्यांना महिना दहा हजार रुपये द्यावेत)
8.पीकविम्यावरील ट्रिगर उठवावेत.