Manoj Jarange : मनोज जरांगेंची पॉवर किती?

Pradeep Pendhare

आंदोलनाला सुरवात

मनोज जरांगे यांनी सप्टेंबर 2023 पासून अंतरवली सराटी इथं मराठा आरक्षणासाठी लढा उभारला, बेमुदत उपोषणामुळे त्यांचे आंदोलन चर्चेत आले.

Manoj Jarange | Sarkarnama

लाँग मार्च काढला

मराठा आरक्षणासाठी मुंबई मंत्रालयावर 'लाँग मार्च' काढला, वाशी इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सगेसोयरेचा अध्यादेशाची पत्र दिली.

Manoj Jarange | Sarkarnama

लोकसभेला महायुतीला फटका

लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातील मतदारसंघात मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा थेट फटका भाजप महायुती सरकारला बसला, महायुतीला छत्रपती संभाजीनगरमध्ये या एकच जागेवर विजय मिळाला.

Manoj Jarange | Sarkarnama

शांतता रॅलीला सुरवात

मनोज जरांगे यांनी आता पुन्हा आंदोलनाची धार तीव्र केली असून, शांतता रॅली सुरू असून महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना अंगावर घेत आहेत.

Manoj Jarange | Sarkarnama

जीवाला धोका

मनोज जरांगे आरक्षणासाठी सातत्याने उपोषण करत असल्याने त्यांची प्रकृती ढासळली आहे. त्यांना सातारा इथल्या सभेत भोवळ आली आणि अंग थरथरत होतं.

Manoj Jarange | Sarkarnama

विधानसभा लढण्याची घोषणा

आरक्षणासाठी प्रस्थापितांना धक्का देण्याचे आव्हान मनोज जरांगे यांनी सुरू केले असून, विधानसभा लढवण्याची तयारी सुरू केली आहे.

Manoj Jarange | Sarkarnama

चाचपणी सुरू

मराठा आरक्षण मिळवण्यासाठी विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा करत, त्याची चाचपणी सुरू केली असल्याचे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

Manoj Jarange | Sarkarnama

60 ते 65 जागांवर फटका

मनोज जरांगे यांच्या नेतृ्त्वाखाली आंदोलनकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीत उडी घेतल्यास सत्ताधारी आणि विरोधकांना 60 ते 65 जागांवर फटका बसेल, असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे.

Manoj Jarange | Sarkarnama

महायुतीलाच धोका

मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसला, तसंच विधानसभेला महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष आणि महायुतीला बसेल, असा देखील अंदाज वर्तवला जात आहे.

Mahavikas Aghadi | Sarkarnama

NEXT : उपमुख्यमंत्री अजितदादांनी सिन्नरमध्ये काढली बाईक रॅली

येथे क्लिक करा :