Manoj Naravane book controversy : ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’नंतर मोदी सरकार अलर्ट मोडमध्ये; अधिकाऱ्यांच्या लेखन स्वातंत्र्यावर गंडांतर

Pradeep Pendhare

माजी लष्करप्रमुखांचं पुस्तक

माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ या पुस्तकावरून मोठा वाद निर्माण झाला आहे.

Manoj Naravane book | Sarkarnama

मोदी सरकारला हादरे

पुस्तक प्रकाशित होण्यापूर्वीच मोदी सरकारला हादरे बसल्याने लष्करी अधिकाऱ्यांच्या लेखणीवर निर्बंध आणण्यासाठी पाऊल टाकले आहे.

Manoj Naravane book | Sarkarnama

नवीन गाईडलाइन्स

लष्कराशी संबंधित पुस्तके लिहिण्यासाठी आणि प्रकाशित करण्यासाठी संरक्षण मंत्रालय नवीन गाईडलाइन्स लागू करणार आहे.

Manoj Naravane book | Sarkarnama

नियम बंधनकारक

पुस्तक प्रकाशित करू इच्छिणाऱ्या लष्करी अधिकाऱ्यांसाठी नवे नियम बंधनकारक असणार आहेत.

Manoj Naravane book | Sarkarnama

नियमांची उच्चस्तरीय बैठक

नवीन नियम तयार करण्यासाठी नुकतीच मोदी सरकारमधील केंद्रीय संरक्षण विभागाची उच्चस्तरीय बैठक पार पडली.

Manoj Naravane book | Sarkarnama

कायद्यांमध्ये समावेश

नव्या गाईडलाइन्समध्ये विद्यमान सेवा नियम तसेच अधिकृत गुपिते कायद्याच्या तरतुदींचा समावेश असण्याची शक्यता आहे.

Manoj Naravane book | Sarkarnama

गोपनीय अन् संवेदनशीलता

निवृत्त लष्करी अधिकाऱ्याच्या पुस्तकात लष्करी कारवायांशी संबंधित संवेदनशील माहिती किंवा गोपनीय माहिती असेल, तर ती प्रथम संरक्षण मंत्रालयाला सादर करावी लागणार.

Manoj Naravane book | Sarkarnama

कडक नियम

लष्करी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी नियम कडक असून, कोणतेही पुस्तक किंवा लेखासाठी लेखी परवानगी घ्यावी लागते. ही परवानगी कमांडद्वारे लष्कर मुख्यालय किंवा संरक्षण मंत्रालयापर्यंत पोहोचते.

Manoj Naravane book | Sarkarnama

सक्त मनाई

वर्गीकृत माहिती, लष्करी कारवाया, शस्त्रास्त्र क्षमता, राष्ट्रीय सुरक्षा किंवा परराष्ट्र संबंधांवर परिणाम करू शकणारा मजकूर असलेले कोणतेही पुस्तक प्रकाशित करण्यास सक्त मनाई आहे.

Manoj Naravane book | Sarkarnama

NEXT : कोण आहेत तारिक रेहमान?

येथे क्लिक करा :