Rashmi Mane
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र व आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी 'चलो मुंबई' असा नारा देत मुंबईला कूच केली आहे.
जरांगे पाटलांनी 20 जानेवारीला मुंबईला जाण्याची घोषणा बीडच्या अंतिम इशारा सभेतून केली होती.
शनिवारी अंतरवाली सराटी येथून मनोज जरांगे पाटलांनी पादयात्रा काढत मुंबईकडे कुच केली.
या पदयात्रेसाठी मराठा आंदोलकांनी जोरदार तयारी केली आहे. अंतरवालीतून शहागड - गेवराई व पुढे कोळगाव येथे दुपारचे जेवण झाले. त्यानंतर पदयात्रेचा रात्रीचा मुक्काम जरांगे पाटलांच्या मातोरी गावात होणार आहे.
जरांगेंसोबत मोठ्या प्रमाणावर मराठा समाज बांधव सहभागी झाले आहेत.
जेवण आणि राहण्यासाठीचे सर्व साहित्य आंदोलक सोबत घेऊन निघाले आहेत.
मोटारसायकल, कार, टेम्पो, टॅक्टर, ट्रॉल्यां त्यासोबत मिळेल त्या वाहनांनी मराठा आंदोलक या यात्रेत सहभागी होत आहेत. काहींनी दुचाकीला देखील सजवून सर्व आवश्यक साहित्य सोबत घेतले आहे.
टेम्पो - टॅक्टरच्या ट्रॉल्यांना मजले करत सामान ठेवण्यासाठी जागा केली आहे. तसेच पीक अपमध्ये गॅसटाकी, पाण्याच्या टाक्या, अंथरुण - पांघरुणासह जेवणाचे साहित्य सोबत आहे.