Rashmi Mane
आजकाल लग्न म्हणजे प्रेमाचं बंधन कमी... आणि भव्यतेची स्पर्धा जास्त! पण पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर एक मोठा झटका बसलाय. आता मराठा समाज उठला आहे बदलासाठी!
बदलाची सुरुवात कुठून? अहिल्यानगरमध्ये मराठा समाजाने पुढाकार घेत. लग्नसोहळ्यासाठी नवी आचारसंहिता तयार केली. यामध्ये साधेपणावर भर, खर्चाला लगाम आणि परंपरांचा सन्मान आहे.
लग्न शंभर ते दोनशे लोकांमध्येच व्हावेत. वेळेवरच विधी व्हावेत.
नवरा नवरीला हार घालताना उचलून घेऊ नये.
प्री-वेडिंग शूटस पूर्णपणे बंद. पारंपरिकता आणि साधेपणाचा आग्रह!
डीजेचा गोंगाट बंद, पारंपरिक वाद्य आणि लोककलावंतांना प्राधान्य,
संस्कृती जपा – कलावंतांना संधी द्या!
साखरपुडा, हळद, आणि लग्न – एकाच दिवशी
जेवणात फक्त 5 पदार्थ
मानपान आणि मान्यवरांचे भाषण नाही.
दोन्ही बाजूंनी आपापली जबाबदारी
बस्ता आणि मानपान ज्याचे त्याने
प्रत्येक तालुक्यात कार्यकारणी नेमली जाणार
सामूहिक विवाह सोहळ्यांना प्रोत्साहन
अकरा जणांची सुकाणू समिती कार्यरत