मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन पेटले! मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र दाखल्यांसाठी कुठली कागदपत्रे हवीत!

Roshan More

मनोज जरांगेंचे आंदोलन

मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू आहे. ज्यांच्या नोंदी त्यांना जात प्रमाणपत्र देण्याची त्यांची प्रमुख मागणी आहे.

कागदपत्रे

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गावागावांमध्ये जात प्रमाणपत्र काढण्यासाठी आवाहन केले जात आहे.त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी देखील सांगितली जात आहे.

Manoj Jarange Patil | sarkarnama

कोणती कागदपत्रे?

कागदपत्रांमध्ये सर्वात महत्वाचे कागदपत्र म्हणजे 1967 पूर्वी कुणबी म्हणून नोंद असलेले महसूल पुरावे, कढईपत्रक, वारसफेरफार, गाव नमुना.

नातेवाईकांचे कागपत्रे

अर्जदाराचे स्वयंघोषणापत्र मुळ प्रत, अर्जदाराचा मुळ निर्गम उतारा किंवा टी.सी झेरॉक्स. सन 1967 पुर्वीचा जातीचा उल्लेख असलेला प्रवेश निर्गम उतारा किंवा टी.सी. (वडील / सखा चुलता / चुलत चुलता / आजोबा /चुलत आजोबा) किंवा भुमिअभिलेख नमुना नं. 33 / 34 किंवा महसुली पुरावा- क पत्रक / खासपत्रक)

वंशावळ

रेशनकार्ड किंवा स्वस्त धान्य दुकानदार प्रमाणपत्र, वंशावळीमध्ये येणाऱ्या सर्वांचे आधारकार्ड किंवा मतदान कार्ड मयत असतील तर मृत्यू प्रमाणपत्र तसेच वंशावळीचे शपथपत्र.

Manoj Jarange Patil | Sarkarnama

रहिवासी पुरावा

रेशनकार्ड, रहिवासी पुरावा, चालू वीजबील,तहसीलदार, मंडलधिकार यांचा गृहचौकशी अहवाल.

Manoj Jarange Patil | sarkarnama

अर्जदार महिला

अर्जदार महिला विवाहित असेल तर तिच्या नावातील बदलाचे शपथपत्र

फडणवीस सरकारचा जरांगेंचं आंदोलन तापलं असतानाच मराठा समाजासाठी आणखी एक मोठा निर्णय; विद्यार्थ्यांना मिळणार लाभ

Manoj Jarange Protest Government Maratha Student Decision | Sarkarnama
येथे क्लिक करा