Jagdish Patil
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील शुक्रवारी (ता.29) मुंबईत दाखल झाले असून आजपासून त्यांचं बेमुदत उपोषण सुरू झालं आहे.
जरांगेंनी मुंबईकडे कूच करताच लाखो मराठे देखील मुंबईकडे रवाना झालेत. त्यामुळे सरकारला अनपेक्षित अशी गर्दी सध्या मुंबईत झाल्याचं दिसत आहे.
त्यामुळे विधानसभेनंतर जरांगे सपंले म्हणणारे आता तोंडावर पडले असून लोकांनी जरांगेंवर पुन्हा एवढा विश्वास कसा ठेवला? असा प्रश्न अनेकांना पडलाय.
जरांगेंच्या एका हाकेवर लाखो मराठे कसे एकवटले? याच कारण त्यांच्या आजपर्यंतच्या लढ्यात असून त्यांनी समाजासाठी काय काय केलंय? ते जाणून घेऊया.
त्यांचं पूर्ण नाव मनोज रावसाहेब जरांगे असं आहे. मात्र, मराठा आरक्षण आंदोलक जरांगे-पाटील या नावाने ते प्रसिद्ध आहेत.
जरांगेंचा जन्म 1 ऑगस्ट 1982 साली झाला. ते गेवराई तालुक्यातील मातोरीचे रहिवासी असून ते चार भावांमध्ये सर्वात लहान आहेत.
जरांगेंच्या पत्नीचं नाव सुमित्रा पाटील आहे. तर जरांगेंना 3 मुली आणि एक मुलगा अशी एकूण 4 अपत्ये आहेत.
ते सध्या जालन्यातील शाहगडमध्ये राहतात. त्यांनी शिवबा संघटनेची स्थापना करत 15 वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी लढा दिलाय.
आरक्षणाच्या लढ्यासाठी त्यांनी आपली अडीच एकर जमीन देखील विकल्याचं सांगितलं जातं.
जरांगेंनी मराठा आरक्षणासाठी अनेक आंदोलन केली आहेत. आजपासून आझाद मैदानात सुरू होणारं त्यांचं आठवं उपोषण आहे.