Maratha Reservation News : मराठा आरक्षण बिल मंजूर अन् शिंदेंच्या अंगावर उधळला गुलाल; पाहा खास फोटो!

Chetan Zadpe

विधेयक मंजूर अन् उधळला गुलाल -

विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात एकमताने मराठा आरक्षण विधेयकाला मंजुरी देण्यात आली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर विजयाचा गुलाल उधळण्यात आला.

समर्थकांचा जल्लोष -

या वेळी समर्थकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गराडा घालून, गुलाल उधळत एकच जल्लोष केला गेला.

शिंदेंकडून अभिवादन -

मुख्यमंत्री शिंदे यांनी जमलेल्या मराठा बांधव आणि समर्थकांना अभिवादन केले.

सरकारमधील नेतेही उपस्थित -

विधिमंडळाच्या परिसरात या वेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही मुख्यमंत्र्यांसोबत होते.

मराठ्यांचे पाठीराखे -

या वेळी 'मराठ्यांचे पाठीराखे' असे फलक घेऊन समर्थक उपस्थित होते.

शिंदेंनी शेअर केला फोटो -

मराठ्यांचे पाठीराखे असा फलक घेऊन आलेल्या एक वृद्ध समर्थकाने सर्वांचे लक्ष वेधले. शिंदे यांनी आपल्या सोशल मीडियावर हा फोटो शेअर केला आहे.

महिला समर्थकांची उपस्थिती -

मुख्यमंत्र्यांचे आभार मानण्यासाठी महिला समर्थकांनी उपस्थिती लावली होती.

R

NEXT : राष्ट्र सेवा दल ते कम्युनिस्ट पक्षाचे नेते; गोविंद पानसरे यांचा प्रवास...