Mangesh Chivate : सरकार आणि जरांगेंमधील दुवा ; कोण आहेत मंगेश चिवटे...

Amol Sutar

ओएसडी

मंगेश चिवटे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी आहेत. आरोग्य निधी गरजूपर्यंत पोहोचवण्याची कामगिरी ते उत्तमरित्या सांभाळत आहेत.

Mangesh Chivate | Sarkarnama

संवाद

मराठा आरक्षणासंदर्भात मंगेश चिवटे यांनी सातत्याने मनोज जरांगे यांच्याशी संवाद साधला. त्यांचे शंकानिरसन करुन त्यांची भूमिका सरकारपर्यंत पोहोचविली.

Mangesh Chivate | Sarkarnama

कोरोना

कोरोनाच्या काळात मंगेश चिवटे यांनी अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडली होती. त्यावेळी त्यांनी असंख्य गरजूंना मदत केली होती.

Mangesh Chivate | Sarkarnama

आरोग्यदुत

कोरोनातील कामगिरीमुळे त्यांना आरोग्यदुत म्हणत होते. त्यांची ही धडपड, तळमळ, प्रामाणिकपणा आणि संवादाची शैली पाहूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांच्यावर विश्वास टाकला.

Mangesh Chivate | Sarkarnama

शिष्टमंडळात समावेश

मनोज जरांगे यांच्या तिसऱ्या टप्प्यातील आंदोलनाच्यावेळी जरांगे यांच्याशी संवाद साधणाऱ्या शिष्टमंडळात मंगेश चिवटे यांचा समावेश केला.

Mangesh Chivate | Sarkarnama

मंगेश चिवटे कायम

मनोज जरांगेंशी संवाद साधणाऱ्या शिष्टमंडळातील चेहरे प्रत्येकवेळी बदलले, पण मंगेश चिवटे कायम शिष्टमंडळात राहिले.

Mangesh Chivate | Sarkarnama

भूमिका

कोणतीही प्रसिद्धी न घेता, कोणतेही मीडिया बाईट न करता मंगेश चिवटे यांनी आपली भूमिका पार पाडली. 

Mangesh Chivate | Sarkarnama

पहिला विजयाचा गुलाल

मनोज जरांगेच्या विजयाचा गुलाल उधळला गेला, तेव्हा मराठ्यांनी पहिला विजयाचा गुलाल मंगेश चिवटे यांच्या कपाळाला लावला.

Mangesh Chivate | Sarkarnama

अश्रू ओघळले

मराठा आंदोलकांनी मंगेश चिवटे यांना खांद्यावर घेऊन ठेका धरला. तर अचानकपणे झालेल्या या आदरसत्काराने चिवटेही भारावून गेले. यावेळी त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले.

Mangesh Chivate | Sarkarnama

NEXT : Civil Services Examination: IAS-IPS अधिकाऱ्यांचे केडर कसे ठरवले जाते ? जाणून घ्या...!

येथे क्लिक करा