Jagdish Patil
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगेंनी अंतरवली सराटीत 30 मेच्या सकाळपासून उपोषण सुरू केलं होतं.
उन्हाच्या कडाक्याने मेलो तरी मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार घेणार नाही, असा इशारा जरांगेंनी दिला होता.
त्यानंतर काल शनिवारी (ता.३०) मध्यरात्री जरांगे पाटलांनी आपलं उपोषण स्थगित केलं आहे.
मराठा आरक्षण अभ्यासक आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर त्यांनी हा निर्णय घेतला.
अभ्यासकांच्या सूचना सरकारने मान्य केल्यानंतर विखे आणि आमदार प्रसाद लाड यांनी रात्री 10 नंतर जरांगेंची भेट घेतली.
यावेळी मध्यरात्री दीडच्या सुमारास या दोन्ही नेत्यांच्या हातून पाणी पिऊन जरांगेंनी उपोषण मागे घेतलं.
सरकारच्या ड्राफ्टनुसार येत्या मंगळवारपर्यंत जीआर काढण्याचे आश्वासन देण्यात आलं आहे.
मात्र, मंगळवारपर्यंत आदेश न निघाल्यास पुन्हा उपोषणाला बसण्याचा इशाराही जरांगेंनी दिला आहे.
तसंच उपोषण सोडताना जरांगेंनी सातारा गॅझेटीयरसाठी सरकारला एक महिना वेळ दिला आहे.
दरम्यान, आता ही प्रक्रिया थांबली तर विखे पाटील आणि प्रसाद लाड यांना जबाबदार धरणार, असा इशाराही जरांगेंनी दिला.