Roshan More
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नाशिकमध्ये मुंबई-आग्रा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.
रास्ता रोकोमुळे मुंबई-आग्रा महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती.
या आंदोलनामुळे पोलिसांची धावपळ उडाली. बळाचा वापर करत त्यांनी आंदोलकांना रस्तावरून बाजूला केले.
रास्ता रोको आंदोलनावेळी सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
राज्य सरकारने आरक्षणावर निर्णय न घेतल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा आंदोलकांनी दिला.
केज, अंबाजोगाई, नेकनूर, धारुर आदी ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
आंदोलनाचा परिणाम परिवहन विभागाच्या वाहतुकीवर झाला. अनेक एसटी बस रद्द करण्यात आल्या.
R