Pradeep Pendhare
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत 29 ऑगस्टला मोर्चाचं आयोजन केलं आहे.
ओबीसीमधून आरक्षण घेतल्याशिवाय यावेळी मुंबईतून माघारी फिरणार नसल्याची भूमिका मनोज जरांगे पाटलांनी जाहीर केली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मोर्चा निघत असल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
मनोज जरांगे पाटील मुंबईतील मोर्चावर अजून तरी ठाम असून, माघार नेणार असल्याची भूमिका बोलत आहे.
मोर्चापूर्वी मनोज जरांगे पाटलांनी भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शाब्दिक हल्ले सुरू केले आहेत.
मराठा नेते भाजपच्या दबावाखाली असल्याचा आरोप देखील मनोज जरांगे पाटलांनी करत खळबळ उडवून दिली.
मोर्चात दंगल घडवणे, हल्ले करण्याचा कट असल्याचा आरोप करत मनोज जरांगे पाटलांनी वातावरण निर्मिती केली आहे.
मनोज जरांगे पाटील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदार संघातून मुंबईत दाखल होतील.