Jagdish Patil
मराठ्यांना OBC कोट्यातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबईकडे कूच करण्याआधी त्यांनी मराठा समाजाच्या लोकप्रतिनिधींना देखील या आंदोलनात सामील करण्याचं आवाहन मराठ्यांना केलं होतं.
त्यानंतर आता अनेक लोकप्रतिनिधींनी जरांगेंच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. यामध्ये नेमके कोणाकोणाचा समावेश आहे ते जाणून घेऊया.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी जरांगेंच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. काल त्यांनी जरांगेंची भेट देखील घेतली आहे.
माजलगावचे अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी सुरुवातीपासूनच जरांगे यांच्या मराठा आंदोलनाला पाठिंबा देत प्रत्यक्ष सहभागी होणार असल्यचां जाहीर केलं आहे.
बीडचे खासदार (शरद पवार गट) बजरंग सोनवणे यांनी देखील जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. मी खासदार होण्यात जरांगेंचा मोठा वाटा असल्याचं सोनवणे यांनी अनेकदा म्हटलं आहे.
राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंह पंडित यांनी देखील चलो मुंबई असा नारा देत आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिलाय. त्यांनी जरांगेच्या आंदोलनासाठी केलेल्या बॅनरबाजीवरून लक्ष्मण हाके आणि त्यांच्यात मोठा वादही झाला.
ठाकरेंच्या शिवसेनेचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी देखील फेसबुक पोस्ट करत मराठा आरक्षणाबाबतची तक्काळ तोडगा काढण्याची मागणी केली आहे.
धाराशिव-कळंब विधानसभेचे ठाकरेंचे आमदार कैलास पाटील देखील जनतेला जरांगे पाटलांच्या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं.
परभणीचे ठाकरेंचे खासदार संजय जाधव यांनी सरकारवर टीका करत मराठा आरक्षणासाठीच्या लढाईत आपण सहभागी होणार असल्याचं सांगत जरांगेंना उघड पाठिंबा दिला आहे.