Roshan More
अखिल भारतीय छावा संघटनेची स्थापना आण्णासाहेब जावळे पाटील यांनी केली.
छावा संघटनेची ओळख ही आक्रमक संघटना म्हणून आहे.
अखिल भारतीय छावा संघनटेचा प्रभाव विशेष करून मराठवाड्यामध्ये आहे.
लातूरमध्ये आण्णासाहेब जावळे यांनी एका IAS अधिकाऱ्याला मारहाण केली होती.
पाच फेब्रुवारी 2013 ला अण्णासाहेब जावळे पाटील यांचे निधन झाले.
छावा संघटनेचे पदाधिकारी विजयकुमार घाडगे-पाटील यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी मारहाण केल्याने ही संघनटना चर्चेत आली आहे. आता घाडगे हे थेट अजित पवार यांची भेट घेण्यासाठी निघाले आहेत.
मराठा समाजाला आरक्षण ही छावा संघटनेची मुख्य मागणी राहिली आहे. या मागणीसाठी अनेकदा आंदोलने देखील केली आहे.
अण्णासाहेब यांच्या निधनानंतर त्यांचे बंधू नानासाहेब जावळे पाटील यांच्याकडे संघटनेची जबाबदारी आली. ते संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष आहेत.