Ganesh Sonawane
माणिकराव कोकाटे हे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील रहिवासी आहेत.
सिन्नर विधानसभा मतदारसंघातून ते पाचवेळा निवडून आलेले आहेत.
१९९९ मध्ये त्यांनी पहिल्यांदा शिवसेनेच्या तिकिटावर आमदारकीची निवडणूक जिंकली.
२००४ मध्ये ते दुसऱ्यांदा सिन्नर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून आले.
कोकाटे यांनी २००९ मध्ये शिवसेना सोडली. त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. ते तिसऱ्यांदा आमदार झाले.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला. मात्र, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.
२०१९ मध्ये कोकाटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि चौथ्यांदा आमदार झाले.
राष्ट्रवादी पक्षात फुट पडल्यानंतर कोकाटे यांनी अजित पवार यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला.
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत ते पाचव्यांदा विजयी झाले. ते कृषीमंत्री झाले.