Deepak Kulkarni
मराठी कलाविश्वातला एक उत्तम कलाकार म्हणून संकर्षण कऱ्हाडे ओळखला जातो.
संकर्षणने आत्तापर्यंत अनेक मराठी चित्रपट,नाटकं,मालिका यांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
तो अभिनयासोबतच कविताही करतो. त्याच्या हृदयस्पर्शी कवितांनी त्यानं अनेकदा प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. तो उत्तम निवेदक,सूत्रसंचालक अशा वेगवेगळ्या भूमिकांमधूनही अनेकदा वावरत असतो.
संकर्षनं नुकतीच दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. याविषयीची माहिती त्यानं सोशल मीडियावर दिली आहे.
या स्पेशल भेटीदरम्यान नितीन गडकरी यांनी संकर्षणला खास भेटवस्तूही दिली आहे.
आज दिल्लीमध्ये नितीन गडकरीसाहेबांची भेट झाली… त्यांनी स्वतः लिहिलेलं पुस्तक, स्वाक्षरी करुन भेट म्हणून दिल्याचं संकर्षणनं सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.
संकर्षणनं गडकरींसोबतच्या अर्ध्या तासाच्या वेळेत गप्पांचे विषय हे घर, घरातली माणसं, लिखाण, नागपूर, दिल्ली आणि “खाणं…” असे चौफेर असल्याचंही आवर्जून सांगितलं.
वाह! मज्जाच आली… थँक्यू सर! असे आभार मानतानाच संकर्षणने मित्र अंकित काणे यांनाही धन्यवादही दिले.
नितीन गडकरी यांच्या भेटीनं अभिनेता संकर्षण प्रचंड भारावला. एरवीही तो सोशल मीडियावर विविध पोस्ट करुन चाहत्यांशी जोडलेला असतो. त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या सर्व सुख दु:खांच्या गोष्टींची अपडेट देताना पाहायला मिळतो.