Rashmi Mane
दक्षिण-पश्चिम दिशेने वाहणारा दमट वारा जेव्हा हिंद महासागरातून भारतात प्रवेश करतो, तेव्हा तो 'मॉन्सून' असतो. यामुळे पावसाळा सुरु होतो.
प्रत्येक वर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात केरळात मॉन्सून येतो. येथून तो हळूहळू उत्तर आणि पश्चिमेकडे सरकतो.
महाराष्ट्रात साधारणतः 7 ते 15 जूनदरम्यान मॉन्सून दाखल होतो. कोकणात सुरुवात होते, मग तो घाटमाथा, विदर्भ आणि मराठवाड्याकडे सरकतो.
मोठ्या प्रमाणावर वाऱ्याचा दाब कमी होतो, त्यामुळे समुद्रातून दमट वारे ओढले जातात. हे वारे ढग घेऊन येतात आणि पाऊस पडतो.
2025 मध्ये मॉन्सून वेळेवर आणि सामान्य राहील, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.