Rashmi Mane
केंद्र सरकारने गुरुवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
सरकारने घेतलेला हा निर्णय महाराष्ट्रातील जनतेसाठी आनंद देणारा ठरला आहे. गेली अनेक वर्ष मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न चालू होते. अखेर या लढ्याला यश आलं आहे.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा तर मिळाला पण आता पुढे नेमकं काय होणार? अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे काय? याचे नेमके काय फायदे होतील? याबद्दल जाणून घेऊया.
एखाद्या भाषेचा इतिहास अतीव प्राचीन म्हणजे दीड ते अडीच हजार वर्षं जुना असावा, भाषेत प्राचीन साहित्य हवं. भाषेला स्वतःचे “स्वयंभू”पण असावे. प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक रुप यांचा गाभा कायम असावा.
मराठीच्या बोलींचा अभ्यास, संशोधन, साहित्यसंग्रह करायला अधिक चालना मिळेल. भारतातील सर्व 450 विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय होईल. प्राचीन ग्रंथ अनुवादित करण्याला प्रोत्साहन मिळेल. महाराष्ट्रातील सर्व 12,000 ग्रंथालये सशक्त होतील.
मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, विद्यार्थी अशा साऱ्यांना भरीव मदत मिळेल. प्रत्येक विद्यापीठात अभिजात भाषेसाठी एक अध्यासन केंद्र स्थापन होईल. अभिजात भाषेसाठी सेंटर ऑफ एक्सलंन्स फॉर स्टडिज स्थापन करण्यात येईल.