Dyaneshwar Patil : जीप चालक ते आमदार, असा होता ज्ञानेश्वर पाटील यांचा प्रवास

Roshan More

निधन

माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे बुधवारी (ता.2) रात्री निधन झाले.

dnyaneshwar patil | sarkarnama

कट्टर शिवसैनिक

माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील हे कट्टर शिवसैनिक आणि बाळासाहेब ठाकरेंचे विश्वासू शिलेदार म्हणून परिचित होते.

dnyaneshwar patil | sarkarnama

जीप चालक

ज्ञानेश्वर पाटील यांची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. प्रवास वाहतूक करणाऱ्या जीपवर ते चालक म्हणून काम करत होते. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन ते शिवसेनेत कार्यरत झाले.

dnyaneshwar patil | sarkarnama

सलग दोनदा आमदार

ज्ञानेश्वर पाटील हे भूम परंडा मतदारसंघातून 1995 आणि 1999 च्या विधानसभा निवडणुकीत सलग दोन वेळा विजयी झाले.

dnyaneshwar patil | sarkarnama

जिल्हा बँकेचे संचालक

ज्ञानेश्वर पाटील हे जिल्हा बँकेचे संचालक होते. पंचायत समिती , नगर परिषदेवर शिवसेनेची सत्ता स्थापन करण्यात त्यांचा पुढाकार होता.

dnyaneshwar patil | sarkarnama

सोशल इंजिनिअरिंग

कट्टर हिंदुत्वादी अशी ओळख असलेल्या ज्ञानेश्वर पाटील यांनी अल्पसंख्याक समाजातील कार्यकर्त्यांना संधी दिली. अनेक मुस्लिम शिवसेनेकडून नगरसेवक होते.

dnyaneshwar patil | sarkarnama

उद्धव ठाकरेंना साथ

शिवसेनेत फूट पडल्यानंतर बहुतांश नेत्यांनी एकनाथ शिंदे यांना साथ देणे पसंत केले. मात्र, ज्ञानेश्वर पाटील हे उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ राहत त्यांनी संकटकाळात उद्धव ठाकरेंना साथ दिली,

dnyaneshwar patil | sarkarnama

राजकीय वारस

ज्ञानेश्वर पाटील यांचे पुत्र रणजित पाटील धाराशिवचे शिवसेना (यूबीटी) जिल्हाप्रमुख आहे.

dnyaneshwar patil | sarkarnama

NEXT : उद्धव ठाकरेंच्या उमेदवारीसाठी थेट शरद पवारांना पत्र लिहिणारे जावेद जकारिया कोण?

sarkarnama | Javed Zakaria :
येथे क्लिक करा