Jagdish Patil
मराठवाड्यात पावसाने अक्षरश: थैमान घातलंय. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे.
पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, ओला दुष्काळ जाहीर करत सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे.
विरोधक मागणी करत असलेला ओला दुष्काळ नेमका कधी जाहीर केला जातो आणि त्यासाठी निकष काय असतात? ते जाणून घेऊया.
पाऊस न पडल्यामुळे जसा दुष्काळ पडतो. नेमकं त्या उटल अतिप्रमाणात पडणाऱ्या पाऊसामुळे होणाऱ्या शेतीच्या नुकसानाला ओला दुष्काळ म्हणतात.
एका दिवसात 65 मिमीपेक्षा जास्त पाऊस पडतो त्याला अतिवृष्टी म्हणतात आणि अतिवृष्टीमुळे 33 % हून अधिक पिकांचे नुकसान झालेल्या क्षेत्राला ओला दुष्काळग्रस्त घोषित करतात.
ओला दुष्काळ जाहीर करण्याचे निकष सरकारच्या दुष्काळ व्यवस्थापन मार्गदर्शक तत्त्वांवर आणि स्थानिक परिस्थितीवर आधारित असतात.
पावसाचे प्रमाण जास्त असले तरी, त्याचे वितरण असमान असणं. जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण ठराविक मर्यादेपेक्षा जास्त असल्यास ओला दुष्काळ जाहीर केला जातो.
पाण्याच्या असमान वितरणामुळे पिकांचे नुकसान होणं हा ओला दुष्काळाचा महत्त्वाचा निकष असतो.
पावसाचा कालावधी, तीव्रता, आणि वितरणासह विविध भागातील शेती पद्धती, मातीच्या प्रकाराचा विचार केला जातो.
राज्य, केंद्र सरकारच्या दुष्काळ व्यवस्थापन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, स्थानिक प्रशासन, कृषी विभाग, आणि हवामान खात्याच्या अहवालांच्या आधारे ओला दुष्काळ जाहीर करतात.