Roshan More
संजय यादव हे आरजेडीचे राज्यसभा खासदार आहेत. पण त्यांची ओळख फक्त येवढीच नाही. ते तेजस्वी यादव यांचे राजकीय सल्लागार आणि आरजेडीचे रणनीतीकार आहेत.
संजय यादव हे मुळचे हरियाणातील आहेत. त्यांची आणि तेजस्वी यादव यांची ओळख ते दिल्ली असताना झाली. त्यावेळी तेजस्वी हे क्रिकेटमध्ये आपले नशिब अजमावत होते.
तेजस्वी यांनी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी संजय यादव यांना दिल्लीहून आपल्यासोबत बिहारमध्ये आणले. मैत्रीसाठी संजय हे देखील आपली नोकरीसोडून बिहारमध्ये आले.
संजय यादव हे आरजेडीचे पडद्यामागचे रणनीतीकार म्हणून ओळखळे जात होते. तेजस्वी यादव यांचे ते डोळे आणि कान असल्याचे देखील सांगितले जाते.
तेजस्वी यादव यांनी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना डावलून संजय यादव यांना राज्यसभेची उमेदवारी दिली तेव्हा त्यांना पक्षातून विरोध झाला.
बिहारमध्ये तेजस्वी यादव यांनी यात्रा काढली होती. त्या यात्रेत बसमध्ये तेजस्वी यांच्या सीटवर संजय यादव हे बसले होते. त्यावरून रोहिणी यांनी ट्विट करत संजय यादव यांच्यावर टीका केली.