Jagdish Patil
लोकशाही आणि मानवी हक्कांसाठी सातत्यपूर्ण योगदान दिल्याबद्दल व्हेनेझुएलाच्या नेत्या मारिया कोरिना मचाडो यांना 2025 चा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे.
नॉर्वेच्या नोबेल समितीने यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार मारिया कोरिना मचाडो यांना दिल्याचं जाहीर केलं.
नोबेल हा जगातील सर्वात मोठ्या आणि प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक आहे. या वर्षी समितीकडे एकूण 338 नामांकने आली होती.
यामध्ये 244 व्यक्ती आणि 94 संस्थांचा समावेश होता. नॉर्वेतील नोबेल इन्स्टिट्यूटमध्ये या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.
नोबेल पुरस्काराची स्थापना 1901 मध्ये प्रसिद्ध स्वीडिश शास्त्रज्ञ, रसायनशास्त्रज्ञ आणि डायनामाइटचे शोधक अल्फ्रेड नोबेल यांनी केली.
1901 मध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, शरीर विज्ञान किंवा चिकित्सा, साहित्य आणि शांती या पाच क्षेत्रांमध्ये प्रथम नोबेल पारितोषिके देण्यात आली.
दरवर्षी, नोबेल पारितोषिकांचे वितरण स्टॉकहोम, स्वीडन येथे एका भव्य समारंभात केले जाते. तर शांततेचा नोबेल पुरस्कार नॉर्वेतील ओस्लो येथे दिला जातो.
या कार्यक्रमांसाठी राजघराण्यातील सदस्य, मोठे नेते, शास्त्रज्ञ आणि अनेक प्रसिद्ध लोक सहभागी होतात.
नोबेल पारितोषिक विजेत्यांना एक सुवर्णपदक आणि काही रक्कम मिळते. 2025 मध्ये ही रक्कम 11 दशलक्ष स्वीडिश क्रोना (10.36 कोटी) निश्चित करण्यात आली आहे.