Rashmi Mane
व्हेनेझुएलातील लोकशाही हक्कांसाठी झगडणाऱ्या नेत्या मारिया कोरिना मचाडो यांना यंदाचा 2025 सालचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे.
मचाडो या गेल्या काही वर्षांपासून व्हेनेझुएलामध्ये लोकशाही परत आणण्यासाठी सातत्याने लढा देत आहेत. त्या देशातील जनतेला हुकूमशाहीतून मुक्त करून न्याय्य, शांततापूर्ण आणि लोकशाही आधारित व्यवस्था निर्माण करण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे.
या वर्षी शांततेसाठी एकूण 338 व्यक्ती आणि संस्थांची दावेदार ठरली होती. मात्र, कोणाला हा मान मिळणार याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते.
लॅटिन अमेरिकेमध्ये त्यांना आज नागरी धैर्याचे प्रतीक मानले जाते. देशात राजकीय अस्थिरता आणि आर्थिक संकट असतानाही मचाडो यांनी विरोधी पक्षांना एकत्र आणले आहे.
लोकशाहीसाठी लढा देणाऱ्या सर्वांना एकत्र आणत. त्यांच्या नेतृत्वाखाली विविध विचारांचे विरोधी पक्ष एकत्र आले आणि मुक्त निवडणुकांची मागणी त्यांनी केली होती.
नॉर्वेजियन समितीने त्यांच्या कार्याचे कौतुक करताना म्हटले की, “लोकशाही धोक्यात असताना, तिला टिकवून ठेवण्यासाठी आणि न्याय्य संक्रमणासाठी मारिया कोरिना मचाडो यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.”
मचाडो यांचे राजकीय आयुष्य संघर्षमय राहिले आहे. सत्ताधाऱ्यांच्या दबावाला न जुमानता त्यांनी लोकांशी थेट संवाद साधला, आंदोलने केली आणि देशातील जनतेला आपला हक्क मागण्यासाठी प्रेरित केले. त्या स्वतःवर झालेल्या अनेक अडचणी, अटक धोके आणि धमक्यांनाही न जुमानता लढत राहिल्या.