Deepak Kulkarni
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनं राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती.
देशमुखांच्या हत्येनंतर सरपंचपद रिक्त झाल्यानं पोटनिवडणूक जाहीर झाली. ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी काही ग्रामस्थ आणि देशमुख कुटुंबियांनी प्रचंड धावपळ केली.
संतोष देशमुखांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना सरपंचपदाच्या निवडणुकीत उतरवण्यात आलं होतं. त्यांच्याविरोधात स्वरुपानंद देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
मस्साजोगच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत धक्कादायक निकालाची नोंद झाली. स्वरूपानंद देशमुख यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला निर्णय सार्थ ठरवत 92 मतांनी विजय खेचून आणला.
मस्सागावचे नवनियुक्त सरपंच स्वरूपानंद देशमुख हे राजकारणातील एक अनुभवी नेते म्हणून ओळखले जातात.
संतोष देशमुखांच्या हत्येनंतर तब्बल दीड वर्षानंतर झालेली मस्साजोग ग्रामपंचायत निवडणूक राज्यभरात अत्यंत चर्चेचा विषय ठरली होती. दोन्हीबाजूंनी प्रचाराला चांगलाच जोर लावला होता.
स्वरुपानंद देशमुख यांनी यापूर्वी संतोष देशमुख यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. त्यांत त्यांना अवघ्या 9 मतांनी पराभव स्विकारावा लागला होता.
तसेच प्रचारावेळी स्वरुपानंद यांनी ग्रामपंचायतीत अनेक वर्ष काम केले असून अनेक योजना राबवल्याचा दावा केला होता. तसेच यापूर्वी संतोष देशमुख यांच्या न्यायासाठीच्या लढाईत पुढे होतो, येथून पुढेही असेन असं त्यांनी म्हटलं आहे.
माझे कामच माझी ओळख असल्याचं सांगत निवडणूक संपली,राजकारण संपलं म्हणत मस्साजोगचा विकास करण्याचा मानस त्यांनी विजयानंतर बोलून दाखवला.