Rajanand More
आयपीएस भानू भास्कर हे उत्तर प्रदेशातील प्रयागराज झोनचे अतिरिक्त पोलिस महासंचालक आहेत.
भानू भास्कर यांना गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणून ओळखले जाते. ते 1996 च्या तुकडीतील IPS अधिकारी आहेत.
प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी भानू भास्कर यांच्यावर आहे.
प्रयागराजमध्ये सोमवारी (ता. 11 फेब्रुवारी) प्रचंड वाहतुककोंडी झाली. वाहनचालकांना तब्बल 48 तास या कोंडीचा सामना करावा लागल्याने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ संतापले.
मुख्यमंत्री योगींनी भानू भास्कर यांच्यासह वाहतूक विभागाच्या प्रमुखांना चांगला दम भरला. वाहतूककोंडीस त्यांना जबाबदार धरत थेट निलंबनाचा इशारा दिला.
उत्तर प्रदेशातील दबंग आयपीएस अधिकाऱ्यांपैकी भानू भास्कर हे एक आहेत. त्यामुळे योगी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करणार का, याबाबतच्या चर्चांना राज्यात उधाण आले आहे.
पोलिस दलातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचा 2023 मध्ये राष्ट्रपती पोलिस पदक देऊन गौरव करण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशातील जमीन माफिया आणि तेल माफियांविरोधात त्यांनी मोहिम उघडली होती. त्यात ते यशस्वी ठरल्याने राज्यात दबदबा निर्माण झाला होता.