सरकारनामा ब्यूरो
दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा नवा चेहरा म्हणून सध्या चर्चेत असणारे भाजप नेते प्रवेश वर्मा. जाणून घेऊय त्यांची संपत्ती किती?
दिल्ली विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांचा भाजपाचे प्रवेश वर्मा यांनी दणकावून पराभव केला आहे.
प्रवेश वर्मा यांना लहानपणापासून राजकारणाचा बाळकडू मिळाला आहेत. त्याचे वडील साहिब सिंग वर्मा यांनी 1996-1998 या कालावधीत दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळला होता.
निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार प्रवेश वर्मा यांच्याकडे 2 लाख 20 हजार रुपयाची रोख रक्कम आहे.
बँक खात्यात 1 कोटी 28 लाख रुपयांपेक्षा जास्त ठेवी आहेत. त्यांच्या नावी शेअर्स, बॉन्ड आणि म्युच्युअल फंडमध्ये 52 कोटी 75 लाख रुपयाची गुंतवणूक आहे.
त्यांची पत्नी स्वाती सिंग यांच्याकडे 50 हजार रुपये रोख आणि जवळच्या बँक खात्यात 42 लाख रुपये जमा केलेले आहेत.
स्वाती यांनी शेअर्स, बॉन्ड आणि म्युच्युअल फंडांमध्ये 16 कोटी 55 लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. तर त्यांच्याकडे 20 लाखाचे दागिने आहेत.
प्रवेश यांच्याकडे महिंद्रा, स्कॉर्पिओ तर पत्नीकडे टाटा टियागो या अलिशान कार आहेत. आणि नोएडा येथे त्यांचे दोन फ्लॅट आहेत.