Rashmi Mane
गर्भवती महिलांच्या पोषण व आरोग्याची काळजी घेण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरू केली आहे. यामार्फत महिलांना आर्थिक मदत दिली जाते.
या योजनेचा लाभ गर्भवती व स्तनपान करणाऱ्या महिलांना मिळतो. पहिल्या बाळाच्या जन्मावेळी ही योजना लागू होते. दुसऱ्या मुलीच्या जन्मावरही लाभ मिळतो.
पात्र महिलांनी जवळच्या आंगणवाडी केंद्र किंवा उप आरोग्य केंद्रात जाऊन गर्भधारणेच्या सुरुवातीसच नोंदणी करणे आवश्यक आहे.
यासाठी विशेष मोहीम राबवली जात असून, दररोज सुमारे 122 महिलांचे नोंदणी केली जाणार आहे. एकूण 2068 लाभार्थ्यांना लाभ दिला जाणार आहे.
1. मातृ व बाल सुरक्षा (MCP) कार्ड
2. आधार कार्ड
3. पात्रतेसाठी: जातीचा दाखला, BPL कार्ड, पीएम-जय कार्ड, ई-श्रम कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, आय प्रमाणपत्र इत्यादींपैकी कोणतेही एक
नोंदणी करताना आधारद्वारे ई-केवायसी केली जाते. लाभ डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) द्वारे थेट बँक खात्यात दिला जातो. बँक खाते NPCI लिंक असणे आवश्यक आहे.
पहिल्या बाळासाठी 5,000 रुपये
पहिला हप्ता : 3,000 – पहिल्या 6 महिन्यांत
दुसरा हप्ता : 2,000 – एक प्रसवपूर्व तपासणी झाल्यावर
दुसऱ्या मुलीच्या जन्मासाठी: 6,000
बाळ जन्मल्यानंतर नोंदणी व 14 आठवड्यांचे लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. नोंदणी केलेली बँक खाते व आवश्यक कागदपत्रे बरोबर असावीत.