सरकारनामा ब्यूरो
वडील अब्जाधीश असलेल्या तारा वाचानी या चर्चेत आल्या आहेत. कारण त्या देखील करोडपती आहेत.
तारा सिंग वाचानी या 'मॅक्स इंडिया लिमिटेड' कंपनीच्या उपाध्यक्ष आहेत.
त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर येथे शिक्षण घेतले आहे. सामाजिक कामातही त्यांचा पुढाकार असतो.
तारा यांचे वडील अनिलजीत सिंग यांनी मॅक्स ग्रुपची स्थापन केली होती. अनलजीत यांचा रिअल टाइम नेटवर्थ $1.12 बिलियनमध्ये आहे.
मॅक्स इंडियाचे बाजार भांडवल सुमारे 1,150 कोटी रुपये इतका आहे. 2020 मध्ये वर्ल्ड इकोनॉमिक फोरम या आंतरराष्ट्रीय कंपनीने तारा यांना एक तरुण 'ग्लोबल लीडर' म्हणून मान्यता दिली होती.
मॅक्स इंडिया लिमिटेड कंपनीमध्ये त्या आरोग्यसेवा आणि विमा क्षेत्रात महत्त्वाची भूमिका पार पाडतात. भारतीय उद्योगजगामध्ये त्यांचे नाव आदराने घेतले जाते.
तारा यांचे पती साहिल वाचानी हे मॅक्स इस्टेट कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ म्हणून काम पाहतात.
मॅक्स इंडिया ही मॅक्स ग्रुपच्या कंपनी आहे. यामध्ये केअर होम, केअर ॲट होम, मेडकेअरची उत्पादने आणि AGEasy अशा ज्येष्ठांसाठी स्वतंत्र निवासस्थानाच्या सुविधा उपलब्ध करुन देण्याचे काम ही कंपनी करते.