सरकारनामा ब्यूरो
कुमारी मायावती यांनी दीर्घकाळ बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.
उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदावर त्यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. राष्ट्रीय स्तरावरही त्या सक्रिय आहेत.
मायावती यांनी दोन विषयात पदवीचे शिक्षण पूर्ण केले असून त्यांनी दिल्ली विद्यापीठातून कायद्याची पदवी मिळवली आहे.
दिल्लीमध्ये शिक्षिका म्हणून काम करत असताना त्यांची भेट दलित कार्यकर्ते आणि बसपाचे संस्थापक कांशीराम यांच्याशी झाली.
कांशीराम हे मायावतींचे राजकीय गुरू बनले. बहुजन पक्षाच्या स्थापनेच्या वेळी मायावती यांची त्यांनी अध्यक्षपदी नियुक्ती केली.
बीएसपीचे नेतृत्व हाती घेतल्यानंतर, मायावतींनी राजकीय रणनीती आखली. पक्षाचा मोठ्या प्रमाणावर प्रचार केला.
उत्तर प्रदेशातील लखनौ मतदारसंघातून निवडून आल्यानंतर त्या तीनवेळा लोकसभेवरही निवडून आल्या.
बसपातील त्यांच्या उल्लेखनिय कामगिरीमुळे देशभरातील लोक त्यांना 'बहनजी' म्हणून संबोधतात.
राष्ट्रीय स्तरावर प्रभावशाली असलेल्या मायावती यांनी उत्तर प्रदेशात आपला मोठा ठसा उमटवला आहे.