Jagdish Patil
मायावतींनी भाचा आकाशला पक्षाच्या सर्व पदांवरून हटवलं आहे. 'बसपा' पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
मायावतींच्या निर्णयानुसार आता आकाश आनंद पक्षात कोणत्याही पदावर राहणार नाहीत.
आकाशची हकालपट्टी करण्यामागे त्यांचे सासरे अशोक सिद्धार्थ कारणीभूत असल्याचं सांगण्यात आलं आहे.
अशोक सिद्धार्थ यांनी यूपीसह देशभरात पक्षाला दोन गटात विभागून कमकुवत केल्याचा आरोप मायावतींनी केला आहे.
तर मागील वर्षी मे महिन्यात मायावतींनी आकाश आनंद यांची BSP च्या राष्ट्रीय समन्वयक आणि उत्तराधिकारी पदावरून हकालपट्टी केली होती.
डिसेंबर 2023 मध्ये बसपा सुप्रिमोने त्यांना उत्तराधिकारी म्हणून घोषित केलं. मात्र लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तो निर्णय मागे घेण्यात आला.
आकाश यांनी अनेकदा वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. एकदा भाजप सरकारला 'दहशतवादी' म्हटल्यामिळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यासह त्यांनी अनेकदा आक्षेपार्ह वक्तव्य केली आहेत. ज्यामध्ये 'मला चपला फेकून माराव्या वाटत आहेत' अशा वक्तव्यांचा समावेश आहे.