Aslam Shanedivan
मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोश देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली होती. यामुळे राज्यभर संतापाची लाट उसळली होती.
तिने या दुखावर मात करत नीट (NEET) परीक्षेत यश मिळवले होते. तिला या परीक्षेत 147 गुण मिळाले होते. तर तिचे स्वप्न हे डॉक्टर होण्याचे होते. जे आता सत्यात उतरत आहे.
तिचे डॉक्टरीचे शिक्षण छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम (महात्मा गांधी मिशन) वैद्यकीय महाविद्यालयात सुरू झाले असून येथे तिला एमबीबीएसला प्रवेश मिळाला आहे.
नुकताच ती 14 दिवसांच्या दिवाळी सुटीसाठी मस्साजोगला आली आहे. यावेळी तिने शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांची बारामती येथे भेट घेतली.
या भेटीवेळी वैभवीने स्वत: केलेले पेंटिंग शरद पवार यांचे स्केच त्यांना भेट दिले. ज्यानंतर पवार यांनी वैभवीचे कौतुक केल्याचे म्हटलं आहे
तसेच वैभवीने खासदार सुप्रिया सुळे यांना देखील स्वत: केलेले पेंटिंग दिले आहे.